Friday 9 December 2011

बालोपासना

 || बालोपासना ||
श्री गणपते,विघ्ननाशना | मंगलमूर्ते,मूषकवाहना ||
तिमिरनाशिसी,निजज्ञान देवूनी | रक्षिसी सदा,सुभक्ता लागुनी ||
खड्ग दे मला,प्रेमरूपी हे | मारीनषड्रिपू,दुष्टदैत्य हे ||
बालकापरी,जवळी घे मज | ईश जगाचा तु,मी तव पदरज ||
मनोहर तुझी,मूर्ती पहावया | लागी दिव्यदृष्टी,देयी मोरया ||
पुरवी हेतूला,करुनी करुणा |रमवी भजनी, कलिमल दहना ||

|| आनंद लहरी ||
ज्ञानभास्करा शांतीसागरा | भक्त मनोहर मुकुंदा |
परमउदारा भवभयंहरा | रखुमाईवरा सुखकंदा ||१||
पापताप दुरीतादि हराया | तूची समर्थ यदुराया |
म्हणोनी तुजसी एकोभावे | शरण मी आलो यदुराया ||२||
कंठी निशिदिनी नाम वसो | चित्ती अखंड प्रेम ठसो |
शामसुंदरा सर्वकाळ मज | तुझे सगुण रूप दिसो ||३||
तु माऊली मी लेकरू देवा | मी स्वामी मी चाकरू |
मी पान तु तरुवरा देवा | तु धेनु मी वासरू ||४||
तु पावन मी पतित देवा | तु दाता मी याचक |
तु फुल मी सुहास देवा | तु मालक मी सेवक ||५||
तु गुळ मी गोडी देवा | तु धनुष्य मी बाण |
तु डोंगर मी चारा देवा | तु चंदन मी सहाण ||६||
तु चंद्र मी चकोर देवा | मी कला तु पोर्णिमा |
तुझ्या वर्णनासी नाही सीमा | असा अगाध तुझा महिमा ||७||
तु जल मी बर्फ देवा | तु सागरी मी लहरी |
तुजविन क्षणमज युगसम वाटो | हेचि मागणे श्रीहरी ||८||
वत्सा गाय बाळा माय | तेवी मजला तु आई |
काय वाचा माने सदोदित | तव पदी सेवा मज देई ||९||
ध्यास नसो दे विषयाचा मज | तुझ्या पायी मन सतत रमो |
द्रुढ तर भावे तव गुण गाता | कोठे माझे मन न गमो ||१०||
अनंत रुप एको भावे | करितो अनंत नमस्कार |
दास पानाचे सुख सोहळे | भोगावी प्रभो निरंतर ||११||
नको मजवरी राहू उदास | धावत येई यदुराया |
तव दर्शनेविन दुजी न आस | धावत येई यदुराया ||१२||







|| नारायानाष्टके ||
नारायणा हे नारायणा | नारायणा हे नारायणा |
नारायणा हे नारायणा | नारायणा हे नारायणा ||धृ||
जगादिस्तंभा नारायणा | लक्ष्मीवल्लभ नारायणा |
कमलनाभा नारायणा | नारायणा हे नारायणा ||१||
देवकीनंदना नारायणा | गोपिजीवन नारायणा |
कालीयामर्दना नारायणा | नारायणा हे नारायणा ||२||
सुहास्यवदना नारायणा | राजीवलोचना नारायणा |
मदनमोहना नारायणा | नारायणा हे नारायणा ||३||
जगज्जन्नका नारायणा | जगत्पालका नारायणा |
जगन्निवासका नारायणा | नारायणा हे नारायणा ||४||
पतितपावना नारायणा | पीतवसना नारायणा |
शेषशयना नारायणा | नारायणा हे नारायणा ||५||
त्रिगुनातीता नारायणा | षड्गुणवंता नारायणा |
वसुदेवसुता नारायणा | नारायणा हे नारायणा ||६||
सुरनरवंदना नारायणा | असुरकंदना नारायणा |
नित्यानिरांजना नारायणा | नारायणा हे नारायणा ||७||
यदुकुलभूषणा नारायणा | भवसिंधुतरणा नारायणा |
कलिमलहरणा नारायणा | नारायणा हे नारायणा ||८||

|| चोवीस नामावली ||
केशवा, दे मजला विसावा | आलो शरण तुला ||१||
नारायणा, करी मजवरी करुणा | आलो शरण तुला ||२||
माधवा, चैन पडेना जीवा | आलो शरण तुला ||३||
गोविंदा, दे तव नाम छंदा | आलो शरण तुला ||४||
श्री विष्णू, मी वत्स तु धेनु | आलो शरण तुला ||५||
मधुसुदना, वारी चित्तवेदना | आलो शरण तुला ||६||
त्रिविक्रमा, अगाध तुझा महिमा | आलो शरण तुला ||७||
वामना, पुरवी मनकामना | आलो शरण तुला ||८||
श्रीधरा,तुजविण नको पसारा | आलो शरण तुला ||९||
ऋषीकेशा, तोडी वेगी भवपाशा | आलो शरण तुला ||१०||
पद्मनाभा, जगताचा तु गाभा | आलो शरण तुला ||११||
अनिरुद्धा, दे तव भक्ती श्रद्धा | आलो शरण तुला ||१२||
पुरुषोत्तमा, भजनी दे मज प्रेमा | आलो शरण तुला ||१३||
अधोक्षजा, सत्य सखा तु माझा | आलो शरण तुला ||१४||
नरसिंव्हा, कृपा करिसी तु केव्हा | आलो शरण तुला ||१५||
अच्युता, तुजविण नाही त्राता | आलो शरण तुला ||१६||
जनार्दना, घे पदरी या दीना | आलो शरण तुला ||१७||
उपेन्द्रा, घालवी आळस निद्रा | आलो शरण तुला ||१८||
श्रीहरी, जन्ममरणाते वारी | आलो शरण तुला ||१९||
श्रीकृष्णा, घालवी माझी तृष्णा | आलो शरण तुला ||२०||
निरंजना, रुक्मिणीच्या जीवना | आलो शरण तुला ||२१||

|| गुरुपादुकाष्टके ||
दयावंत कृपावंत सद्गुरुराया, अनन्यभावेशरण आलो मी पाया |
भावभ्रमातुनी काढी त्वरे या दीनासी, नमस्कार करितो तुझ्या
पादुकांसी ||धृ||
अनंत अपराधी मी सत्य आहे, म्हणोनी तुझा दास होऊ इच्छिताहे |
तुजविण हे दुःख सांगू कुणाशी, नमस्कार करितो तुझ्या
पादुकांसी ||१||
मतिहीन परदेशी मी एक आहे, तुजविण जागी कोणी प्रेमे न पाहे |
जननी जनक इष्ट बंधू तु मजसी, नमस्कार करितो तुझ्या
पादुकांसी ||२||
जगतपसारा दिसो सर्वे भावे, अखंडी तव पायी मज देयी ठाव |
विषया परी विषय वाटो मनासी, नमस्कार करितो तुझ्या
पादुकांसी ||३||
तव आज्ञेसी पालील जो एको भावे, तयासीचं तु भेट देसी स्वभावे |
म्हणोनी अनन्यशरण आलो मी तुजसी, नमस्कार करितो तुझ्या
पादुकांसी ||४||
किती दिवस गाऊ हे संसारगाणे, तुजविण कोण हे चुकविल पेने |
नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी, नमस्कार करितो तुझ्या
पादुकांसी ||५||
सुवर्णसी सोडूनी ना कांती न राही, सुमनासी न सोडी सुहास पाही |
तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी, नमस्कार करितो तुझ्या
पादुकांसी ||६||
कलावंत भगवंत अनंतदेवा, मनकामना पुरवी दे अखंडतवभक्तीमेवा |
कृपा करोनी मज ठेवी स्वदेसी, नमस्कार करितो तुझ्या
पादुकांसी ||७||











नमन करितो अनंता, सुमन वाहतो श्रीकांता ,
ठेवितो चरणावरी माता, जय जय यदुवीर समर्था ||धृ||
त्रयभूवनाचा तु छंद, असशी सच्चिदानंद ,
परी सगुण होऊनी रमवीशी भक्ता, जय जय यदुवीर समर्था ||१||
देवकीने तुज वाहिले, नंदराणीने पाळिले,
तोषविली गोकुळची जनता , जय जय यदुवीर समर्था ||२||
पुतनेचे विष सोशियले, बाकसुरासी मारीयले ,
करांगुळी गोवर्धनधरिता, जय जय यदुवीर समर्था ||३||
कालीयावारी नाचसी, मंजुळ मुरली वाजवसि ,
यमुना तीरी धेनु चरिता, जय जय यदुवीर समर्था ||४||
गोपिसवे रास खेळसी ,अक्रुरासह मथुरे जासी ,
गज आपटिला भूमिवरिता, जय जय यदुवीर समर्था ||५||
कंसाचे केले कंदन, राज्य स्थापिला उग्रसेन ,
सुखविलेसी तातमाता, जय जय यदुवीर समर्था ||६||
गुरु गृहे कष्टे वाहिली, विप्रा सुवर्णापुरी दिधली ,
भक्तांची कामना पुरविता, जय जय यदुवीर समर्था ||७||
अर्जुनासी कथिली गीता, ती झाली सकळा माता ,
बोधणे कलिमल हरिता, जय जय यदुवीर समर्था ||८||


|| पूजा ||
गिरीधर, मी पूजणार आजी, गिरीधर, मी पूजणार आजी |
यदुवीर, मी पूजणार आजी, यदुवीर, मी पूजणार आजी ||धृ||
रत्नजडित सिव्हासन बसवूनी, झारीत घेउनी गुलाबपाणी |
प्रभूरायाचे मुख न्याहाळोनी, स्वकरे पाय धुणार आजी,
गिरीधर, मी पूजणार आजी ||१||
चंदनउटी लाउनी अंगाला, नेसवूनी पितांबर पिवळा |
अंगावरी भरजरी लाल शेला, पांघराया देणार आजी ,
गिरीधर, मी पूजणार आजी ||२||
जाईजुई मोगरामालती, चाफाबकुळी सुगंधीशेवंती |
दवणावरभा तुळसवैजयंती, गुंफुनी हार करणार आजी ,
गिरीधर, मी पूजणार आजी ||३||
कपाळी लाउनी कस्तुरी टिळा, सुमन हार घालुनी गळा |
हास्यवदन घनश्याम सोहळा, डोळेभर पाहणार आजी ,
गिरीधर, मी पूजणार आजी ||४||
धूप घालुनी दीप लावीन, दुध फळाते प्रेमी अर्पिन |
मंगलारती ओवाळून, प्रभूचे गाणार आजी ,
गिरीधर, मी पूजणार आजी ||५||
परमपावना रुक्मिणीजीवना, निशिदिनी कारीरत तवगुण गाणा |
ऐसे भावे करुनी प्रार्थना, पदी मस्तक ठेवणार आजी ,
गिरीधर, मी पूजणार आजी ||६||


तवभक्ती लागी तनु ही झिजू दे | तवचरणकमली मन हे रीझू दे |
तवस्मरणी ठेवी ही वाचा रिझाया | नमस्कार माझा तुला यदुराया ||

|| आरती ||
१)    
जय जय कृष्ण नाथा | तिन्ही लोकींच्या ताता |
आरती ओवाळीता, हरली घोरभव चिंता ||धृ||
धन्य ते गोकुळ हो, जेथे करी कृष्णलीला |
धन्य ती देवकी माता, कृष्णा नवमास पहिला |
धन्य ते वसुदेव, कृष्णा गुप्तपणे रक्षिला |
धन्य ती यमुणाई, कृष्ण पदी ठेवी माता ||१||
जय जय कृष्णा नाथा ||धृ||
धन्य ते नंदयशोदा, ज्यांनी प्रभू खेळविला |
धन्य ते बाळगोपाळ, कृष्ण देई दहीकाला |
धन्य ते गोपगोपी, बघती सुखसोहळा |
धन्य त्या राधारुक्मिनी, कृष्ण प्रेमसरिता ||२||
जय जय कृष्णा नाथा ||धृ||

२)    
ओवाळू आरती माता कलावती, पाहता तुझी मूर्ती मनकामनापूर्ती ||
भावे वंदिता तव दिव्या पाउले, संसारापासुनी माझे मन भंगले,
तुझ्या भजनी नितचित्त रंगले, झाली हस्तापाची पूर्ण शांती ||१||
ओवाळू आरती माता कलावती ||धृ||
गौरवर्ण तनुवरी शोभेशुभ्र अंबर, दर्शनमात्रे लाभे आनंद थोर,
भाषणे सकळ संशय जाती दूर, विशालाक्ष मज दे गुणवंती ||२||
ओवाळू आरती माता कलावती ||धृ||


|| विज्ञापन ||
हे विश्वजनका, विश्वंभरा, विश्वपालका, विश्वेश्वरा !
माझ्या मनाची चंचलता दूर कर.
हे सर्वव्यापी सर्वसाक्षी सर्वोत्तमा सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे.
हे प्रेमसागरा प्रेमानंदा प्रेममुर्ते प्रेमारुपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.
हे नयनरुपा, नयनेषा, न्यानांजना, न्यानज्योती !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा भक्ती द्रुढ कर.
हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहारणा !
समदृष्टी आणि अढळ शांती मला दे.
हे कमलनयना, कमलाकांता, कमलनाथा, कमलाधीषा !
माझ्या नेत्रांना सर्वस्थावर तुझे दर्शन घडू दे, माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत .
हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमाप्रिया !
माझ्या हस्ते तुझी पूजा घडू दे, तुझ्या भोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.
हे गुरुनाथा, गुरुमुर्ते, गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू देत, तुझ्या चरण कमली मला अखंड थारा दे.


|| श्री गोपाल कृष्ण भगवान की जय ||
|| पार्वतेपतेहरहर श्री महादेव भगवान की जय ||
|| परमपूज्य श्री कलावती माता की जय ||
|| ॐ नमः शिवाय ||